साडे येथील विकासात्मक कामात नेहमीच सहकार्य राहील - माजी आमदार नारायण पाटील -

साडे येथील विकासात्मक कामात नेहमीच सहकार्य राहील – माजी आमदार नारायण पाटील

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : साडे ग्रामपंचायतीस विकासत्मक कामात नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. जेऊर येथील नियोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. साडे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी अण्णासाहेब आडेकर यांची निवड करण्यात आल्याबद्दल मा.आ.नारायणआबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जेऊर (ता.करमाळा) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित उपसरपंच मंगलताई पाटील, ग्रापं सदस्य अजिंक्य पाटील, श्रीपती काशीद, सोनाली खराडे, ज्ञानेश्वर तुपे, योगेश लोंढे -गटनेते, सचिन रोकडे, अक्षय पाटील, नागेश लाळगे यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जून सरक, युवानेते पृथ्वीराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठारी, संतोष वाघमोडे, माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की करमाळा तालुक्यातील पुर्व भागात सिंचन क्षेत्र वाढवण्यात आपल्याला यश आले. यापुढे साडे गावासह पुर्व भागातील सर्व ग्रामपंचायतींना शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार. या भागातील नागरीकांना चांगल्या ग्रामसुविधा मिळाव्यात, भौतिक सुविधा सह गावातील आरोग्य, ग्रामस्वच्छता, गावांतर्गत रस्ते, वाडी वस्तीवरील रस्ते, पिण्याचे पाणी आदिसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष निधीची मागणी करुन मंजूरीसाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार स्विय सहायक सूर्यकांत पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!