जेऊर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता कायम - पृथ्वीराज पाटील सरपंच - Saptahik Sandesh

जेऊर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता कायम – पृथ्वीराज पाटील सरपंच

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवत माजी आमदार नारायण पाटील गटाने एकहाती सत्ता मिळवत विजयाची परंपरा कायम राखली आहे. या निवडणुकीत पाटील गटाने सर्वच्या सर्व १५ जागा आणि सरपंच पदाची जागा जिंकून सत्ता हासिल केली आहे.

माजी आमदार नारायण पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील हे सरपंच पदी १३२९ मतांनी विजयी झाले आहेत. पाटील यांना २३७२ मते शिंदे गटाचे नितीन खटके यांना १०४३ तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब कर्चे यांना ९९ मते मिळाली आहेत. जेऊर ग्रामपंचायतीमध्ये पाटील-शिंदे गटात दुरंगी लढत झाली. १५ जागेसाठी १५ उमेदवार निवडणुक रिंगणात उभे होते. परंतु नारायण पाटील यांनी तीस वर्षाची सत्ता कायम ठेवून सरपंच पदासह सर्वच्या सर्व जागा एकहाती जिंकल्या आहेत.

विजयी व पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे..

प्रभाग एक

विजयी उमेदवार धनंजय शिरस्कार (४२८), नागेश झांजुर्णे (४९८), उषा राकेश गरड (४७६). पराभूत उमेदवार – प्रभाग एक: अमर गादीया (२७१), आदिनाथ माने (१९६), प्रिती लोंढे (२१४)

प्रभाग दोन

विजयी उमेदवार- सागर भगत (५६०), शुभम कोठावळे (५२८), शिवांजली कर्णवर (५६३) पराभूत उमेदवार अतुल निर्मळ (२६९), कांचन शिरस्कर ( २३०), निखिल मोरे (२३० )

प्रभाग तीन

विजयी उमेदवार – उमेश मोहिते (४६१), शबाना पठाण (४३५), मालन निमगिरे (४८५) पराभूत उमेदवार – प्रियंका गावडे (१३९), शितल गादीया (१३०), महेश कांडेकर ( १३६ )

प्रभाग चार

विजयी उमेदवार – ओंकार कांडेकर (५३१), अलका किरवे (५४१), प्रियंका निर्मळ (५१४) पराभूत उमेदवार- बालाजी गावडे (१६९), पुनम कदम (१७६), प्रिती लोंढे (१८९)

प्रभाग पाच

विजयी उमेदवार – संदीप कोठारी (४८३), रोहिणी सुतार (५११), समीरा दोशी (४२४ ) पराभूत उमेदवार – अभयराज लुंकड (१७५), धनश्री पाथुडकर (२५२), कांचन शिरस्कर (१७१)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!