सभासदांनी 'आदिनाथ' ची सत्ता ताब्यात दिल्यास सक्षमपणे चालवू : माजी आमदार संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

सभासदांनी ‘आदिनाथ’ ची सत्ता ताब्यात दिल्यास सक्षमपणे चालवू : माजी आमदार संजयमामा शिंदे

करमाळा (दि.११) : साखर कारखानदारी चालवण्याचा आपला अनुभव जुना असून या क्षेत्रातील आव्हानावर मात करून सभासदांनी आदिनाथ ची सत्ता ताब्यात दिल्यास आदि नाथ सहकारी साखर कारखाना सक्षमपणे चालू असा विश्वास मा. आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केला.

करमाळा येथील विठ्ठल निवास या ठिकाणी आज (ता.१०) आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार संजयमामा शिंदे बोलत होते. सध्या साखर कारखानदारी पुढे अनेक आव्हाने असून त्याचा सामना कारखान्यांना करावा लागत आहे. असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून निधीची हमी घेऊन आपण आदिनाथ कारखान्यास गतवैभव मिळवून देऊ असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी सुहास गलांडे, वामनदादा बदे, तात्यासाहेब मस्कर, विवेकराव येवले, पोपटराव सरडे, चंद्रकांत सरडे, राजेंद्र बारकुंड, सुजित तात्या बागल, आणि अजित विघ्ने यांची भाषणे झाली. या विचारविनिमय बैठकीसाठी करमाळा तालुक्यातील संजयमामा समर्थक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करमाळा हीच कर्मभूमी..
जन्मभूमी निमगाव असली तरी कर्मभूमी ही यापुढेही करमाळा तालुकाच राहील. माढा तालुक्यातील छत्तीस गावी तुटली तरी करमाळा हीच कर्मभूमी म्हणून काम करू, त्यामुळे विरोधकांनी माझ्या राजकीय भवितव्याची चिंता करू नये, दरम्यान विधानसभा निवडणुकीत करमाळा तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करून आपल्यावर विश्वास दाखवला याबद्दल करमाळ्यातील जनतेचे आभार व्यक्त करतो… संजयमामा शिंदे (माजी आमदार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!