करमाळा नगर परिषदेकडून माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी -

करमाळा नगर परिषदेकडून माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

0

करमाळा : करमाळा नगरपरिषदेच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कामाम यांची १५ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस नगररचनाकार अभियंता शशांक भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसेगी आपले मनोगत व्यक करताना ते म्हणाले. भारतरत्न डाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरी करण्यात येते. डाॅ. कलाम यांनी भारत अण्वस्त्र सज्ज देश करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. व त्यांनी DRDO व ISRO सारख्या संस्थांमध्ये काम केले होते. तसेच २००२ ते २००७ पर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणुन कार्य केले.

याप्रसंगी हिंदुराव जगताप, प्रशांत खारगे, पियुष शिंपी, बद्रीनाथ गायकवाड, आबा नागटिळक, अमोघसिद्ध परशेट्टी, दत्तात्रय घोलप, मल्हारी चांदगुडे, कमलाकर भोज, संजय जगताप, प्रदीप चौकटे, विक्रम कांबळे, गणेश फलके, ओंकार झाडबुके, अजिम खान व रोहित चौकटे आणि श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथील वाचक, सभासद, विद्यार्थी, विद्यार्थिनी इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!