करमाळा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.आजिनाथ शिंदे यांचे निधन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा वकील संघाचे माजी अध्यक्ष व लोकभारती पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष ॲड.आजिनाथ शिंदे (वय-५०) यांचे आज (ता.६) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराने बारामती येथील रहाते घरी झाले. त्यांचे मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पूर्वीपासून छात्रभारती मध्ये काम करत होते,आमदार कपिल पाटील यांच्याबरोबर ते कार्यरत होते. लोकभारती पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. पूर्वीपासूनच ते चळवळीत काम करत असल्यामुळे सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. स्पष्ट वक्ते म्हणून ते परीचीत होते. अलीकडे ते आमदार संजयमामा शिंदे सोबत ते काम करत होते. काल (ता.5) सायंकाळपर्यंत त्यांनी करमाळ्याच्या न्यायालयात कामकाज केले, मध्यरात्रीनंतर त्यांना अचानक त्रास सुरू झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अत्यंविधी आज (ता.६) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गावी कामोणे (ता.करमाळा) येथे होणार आहे. निधनाचे वृत्त समजताच करमाळा वकील संघाने दुःख व्यक्त केले आहे.ॲड.देविदास शिंदे यांचे ते मोठे बंधू होते.