खेळाडूंच्या पाठीशी बिले परिवार उभा राहणार – माजी प्राचार्य जयप्रकाश बिले
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – खेळाडूंच्या पाठीशी बिले परिवार उभा राहणार असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी केले.
झरे (ता करमाळा) येथे जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहचे निमित विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. बिले बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोसिएशन सहसचिव व आंतराष्ट्रीय पंच पांडुरंग वाघमारे, योद्धा करिअर अॅकॅडमी चे संचालक श्री. गिते, संस्था संचालिका डॉ स्वाती बिले आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन श्री पांडुरंग वाघमारे यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या वेळी वाघमारे यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा कारण खेळणे हा मुलांचा नैसर्गिक अधिकार असून खेळाने शरीराचा व मनाचा विकास होतो. तसेच शरीराचे स्वास्थ ठिकून राहाते असे शेवटी वाघमारे यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ स्वाती बिले यांनी केले तर आभार प्राचार्य खराडे यांनी केले.