फॉरच्युनरची नव्या टेम्पोला धडक - दोन्ही चालक जखमी - Saptahik Sandesh

फॉरच्युनरची नव्या टेम्पोला धडक – दोन्ही चालक जखमी

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : पुणेहून लातूरला जात असलेल्या अशोक लेलॅन्ड कंपनीच्या विना नंबरच्या नवीन टेम्पोला फॉरच्युनर गाडीने धडक देऊन झालेल्या अपघातात दोन्ही गाड्याचे नुकसान झाले असून दोन्ही गाड्याचे चालक जखमी झाले आहेत. हा अपघात ९ ऑगस्टला रात्री पावणेअकरा वाजता फिसरे (ता.करमाळा) गावाजवळ घडला आहे.

या प्रकरणी पुरूषोत्तम पंढरी भलावी (रा.पिंपळगाव, ता. जि. भंडारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की मी कंपनीचा नवीन टेम्पो डिलीवरी करण्याचे काम करतो. चौफुला पुणे येथून नवीन टेम्पो लातूर येथे डिलीवरीसाठी घेऊन जात असताना करमाळा- बार्शी रस्त्यावरील फिसरे गावाच्या पुढे जात असताना बार्शीकडून काळ्या रंगाची फॉरच्युनर ही वेगात आली व त्याने टेम्पोच्या उजव्या साईडला जोराची धडक दिली. त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या बाजुच्या चारीत जाऊन पलटी झाला.

यात मी जखमी झालो असून समोरच्या फॉरच्युनर गाडी क्र. एमएच १४ केडब्लू ००४७ याचेही नुकसान झाले आहे व त्याचा चालकही जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस शिपाई प्रदीप चौधरी हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!