७ मार्च रोजी करमाळा शहरात आरोग्य शिबिर – तज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचारासह औषधांचे मोफत वाटप

करमाळा(दि.१): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकनाथ आरोग्य हीरक वर्षानिमित्त तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलच्या वतीने शुक्रवार ७ मार्च रोजी करमाळ्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नामांकित ३० ते ४० तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. तसेच त्यानुसार मोफत औषधे देखील दिली जाणार आहेत. त्याचबरोबर मोफत चष्म्याचे वाटप देखील केले जाणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. ओंकार उघडे पाटील व सचिव दिपकराव पाटणे म्हणाले की, या आरोग्य शिबिरात कॅन्सर रुग्णांची तपासणी मांजरे हॉस्पिटल बार्शी करणार असून गांधी फाउंडेशन कराड च्यावतीने मोफत डोळे तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे. मुंबई येथील त्वचारोग तज्ञ येणार असून हृदयविकार, डायबिटीस, गुडघेदुखी, सांधेदुखी अशा आजारांची सुद्धा तपासणी करून औषधे दिली जाणार आहेत.
हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुकाप्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख संजय शीलवंत, माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे
चंद्रकांत राखुंडे, छत्रपती दूधसंगल केंद्राचे चेअरमन अजिंक्य पाटील, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश करचे
जेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशी,ओबीसी तालुका अध्यक्ष अंकुशराव जाधव, एडवोकेट शिरीष लोणकर
बाळासाहेब वाघ, नागेश शेंडगे निलेश चव्हाण,संजय जगताप राजेंद्र मिरगळ प्रदीप बनसोडे केशव साळुंखे आदी जण परिश्रम घेत आहेत





