हृदयाला छिद्र असलेल्या बाळावर प्रहार संघटनेच्या माध्यमातून मोफत उपचार -

हृदयाला छिद्र असलेल्या बाळावर प्रहार संघटनेच्या माध्यमातून मोफत उपचार

0

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील पाथुर्डी मधील आजिनाथ पोपट मोटे यांच्या दोन महिन्याच्या बाळाला जन्मताच हृदयाला छिद्र होते असे निदान डॉक्टरांनी केले होते. मोटे यांची परिस्थिती गरिबीची असल्याने शस्त्रक्रियेचा खर्च करणे त्यांना सोपे नव्हते. त्यांनी गावातील प्रहार संघटनेचे समाधान मोटे यांना ही माहिती दिली. मोटे यांनी करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना बाळा विषयी माहिती दिली.

सागर पवार यांनी पुण्याचे मित्र रूग्ण सेवक प्रमोद जाधव, चिरायू हाॅस्पिटलचे सादिक शेख व जिल्हा ध्यक्ष दत्ता भाउ म्हस्के पाटील या सर्वांनी या बाळाला तात्काळ पंढरपूर येथील डॉ.निरज शहा यांच्या हाॅस्पिटलला ऍडमिट करण्यात आले. डॉक्टरांनीही माणूसकी दाखवत संबंधित बाळावर मोफत उपचार करत बाळाला जीवनदान दिले.
या बद्दल प्रहार संघटनेचे टिमचे करमाळा तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात असे बाळ कोणाला आढळून आल्यास प्रहार संघटनेशी संपर्क साधावा. सर्व ती मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करू.

सागर पवार, प्रहार संघटना करमाळा तालुका संपर्कप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!