सोलापूर येथील शांतता रॅलीला जाणाऱ्या १०० चारचाकी व १०० दुचाकी वाहनांचा इंधन खर्च देणार
केम (संजय जाधव) – मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा हा दौरा सोलापूर पासून सुरू होणार असून 7 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीसाठी सोलापूर व इतर जिल्ह्यातून मराठा समाज बांधव उपस्थित राहणार असून या शांतता रॅलीमध्ये करमाळा तालुक्यातून मराठा बांधव जाणार आहेत. त्यांना जाण्यासाठी १०० चार चाकी गाड्यांना डिझेल तर १०० दुचाकी गाड्यांना पेट्रोल मोफत देणार आहे अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अस्थक्ष प्रा. रामदास झोळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपण हि मदत करतो ज्या प्रमाणे आपण मुंबई येथे आंदोलन झाले होते त्या वेळेस देखील भिगवण येथे इंधनाची सोय केली होती त्या प्रमाणे करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधवासाठी मोफत इंधन देण्यात येणार आहे. या साठी प्रा.रामदास झोळ फाउंडेशन करमाळा यांच्याशी मो. ९४०५३१४२९६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.