निंभोरे येथील आरोग्य शिबिरात दीडशे महिलांची तपासणी पूर्ण

केम(संजय जाधव): निंभोरे (ता. करमाळा) येथे प्रहार जनशक्ती पक्ष, यशश्री हॉस्पिटल कंदर आणि ग्रामपंचायत निंभोरे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १५५ महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील आणि ग्रामपंचायतचे सरपंच रविंद्र वळेकर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या शिबिराच्या आयोजनामागे प्रहारचे संस्थापक मा. बचूभाऊ कडू यांची प्रेरणा असून, करमाळा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वातीताई गोरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर राबवण्यात आले.
शिबिरात महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित त्रास, गर्भाशय व पोटातील गाठी, संततीसंबंधी अडचणी, किशोरवयीन मुलींच्या समस्या यासह विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच आवश्यक त्या शस्त्रक्रियांची मोफत सोयही उपलब्ध करून देण्यात आली.

या शिबिरात डॉ. साहिल अत्तार, सिस्टर आयशा, लॅब टेक्निशियन मोहिन जहागिरदार, पी.आर.ओ. सागर लोंढे आणि त्यांच्या टीमने तपासण्या पार पाडल्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेवक असिफ पटेल, आरोग्य सेविका सावरे सिस्टर, समुदाय आरोग्य अधिकारी अभिजीत बागडे, तसेच आशा वर्कर्स चंद्रकला वळेकर, शैलाताई वाघमारे, ज्योती गुरव यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.


शिबिरासाठी तालुका संपर्क प्रमुख सागर पवार, इन्युस पठाण, पप्पू कोंडलकर, नामदेव पालवे, सोमनाथ जाधव, सुनिल डिकोळे, श्याम बोंगाळे, समाधान मोरे, जानू मंगवडे, राहुल निमगिरे, ईश्वर मस्के, समाधान वळेकर, लक्ष्मण वळेकर, महेश वाघमारे, सोमनाथ गुरव, दिलीप मुळे, गणेश वळेकर, नाथा शिंदे, राज पठाण यांचाही मोलाचा सहभाग होता.



