बोरगाव येथे जुगार खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडले

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : बोरगाव येथे जुगार खेळताना तिघा जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून २४५० रूपये रोख, पत्त्याचा डाव जप्त केला आहे. हा प्रकार २१ जानेवारीला दुपारी तीन वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तौफिक काझी यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की बोरगाव येथे समाजमंदिरा जवळ काही लोक तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे समजले. आम्ही तेथे छापा टाकला असता, विनोद माधव घाडगे, बळीराम वसंत मोगल व विकास निवृत्ती ननवरे (सर्व रा. बोरगाव) हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडे पत्ते व २४५० रू. रोख आढळून आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे करत आहेत.


