पालकमंत्री गोरे यांच्या माध्यमातून कोळगाव सबस्टेशनचे सर्व प्रश्न लागणार मार्गी – गणेश चिवटे

करमाळा(दि.६): पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून कोळगाव सबस्टेशनसाठी आवश्यक असणाऱ्या दोन ब्रेकरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या भागातील गावांना अपुऱ्या दाबाने होत असलेला वीज पुरवठा आता पूर्ण दाबाने आठ तास सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे अशी माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले. या नवीन ब्रेकरचे पूजन गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिवटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

कोळगाव सब स्टेशन वर आधारित पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांचा गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित लाईटचा प्रश्न आता मार्गी लागला आहे, कोळगाव सब स्टेशन वरील आधारित शेतकऱ्यांनी भाजपा नेते गणेश चिवटे यांच्याकडे लाईट विषयासंदर्भात तक्रार केली होती यावेळी गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला यावर लगेच पालकमंत्री गोरे यांनी महावितरणला पत्र देऊन दोन ब्रेकरची व्यवस्था केली आहे.

पुढे बोलताना चिवटे म्हणाले की, लवकरच कोळगाव सबस्टेशनवर 3 KVA ऐवजी 5 KVA चा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून या सबस्टेशनचा कायमस्वरूपीचा विजेचा प्रश्न देखील पालकमंत्री मार्गी लावतील. तसेच या भागातील रस्ते व इतर कामेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावू असे मत यावेळी गणेश चिवटे यांनी व्यक्त केले.
“कोळगाव सब स्टेशनवर आधारित आमच्या पाच ते सहा गावांचा वीजपुरवठ्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आम्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला, तरी तो मार्गी लागला नव्हता. मात्र, गणेश चिवटे यांनी पालकमंत्र्यांकडे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावला.”
– सुभाष हनपुडे, सरपंच, गौंडरे.

या कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, कोळगावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे , गौंडरेचे सरपंच सुभाष हनपुडे , हिसरे गावचे सरपंच नवनाथ जगदाळे , वंचित बहूजन आघाडीचे नेते सुभाष ओहोळ, श्रीमंत पाटील, गणेश महाडीक, नाना अनारसे,वैजिनाथ चव्हाण, भाऊ चव्हाण, अजय डौले, विशाल घाडगे, रावसाहेब पाटील, दत्ता विटुकडे, ओमकार पूजारी,नाना पुजारी, भागवत पाटील, पै. विजय विटुकडे, पै. हनुमत पाटील, गणेश रोकडे, ज्ञानेश्वर बिचीतकर,अक्षय हनपुडे, समाधान शिंदे , अतुल चेंडगे, चरण चेंडगे, हंनुमत आतकरे, सुनील जगदाळे, तात्या जगदाळे, उमेश जगदाळे, सौरभ जगदाळे ,रामा कराडे, सिध्देश्वर जगदाळे, भिमराव जगदाळे, दत्ता ठोंबरे,संतोष जगदाळे ,आत्माराम खडके, वैभव खडके, युवराज पाटील, आबा पाटील, नितीन शिंदे, मिलिंद रोकडे, गणेश रोकडे ,दया चेंडगे, समाधान शिंदे, बालाजी गोरे, निखिल वीर, श्रीमंत मोरे, पिंटू निंभोरकर, सचिन माने, हनुमंत अतकरे,अभी शिंदे, राजाराम हराळे, चरण शिंदे, परशुराम शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



