विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून पुढील काळात वाटचाल करावी : गणेश करे पाटील
करमाळा/ संदेश प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून अधिकारी पदी विराजमान झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी आपल्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून पुढील काळात वाटचाल करावी असे आवाहन शकल्याने सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी केडगाव (ता.करमाळा) येथे
अन्नसुरक्षा अधिकारी पदी निवड झालेल्या येथील रोहित लोकरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना केले करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील टिळेकर होते पुढे बोलताना करे पाटील म्हणाले की आज लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न डोळ्यात ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात हे यश मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात मात्र त्यांच्या आई-वडिलांना नाही त्यांच्या शिक्षणासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो मोठे कष्ट घ्यावे लागतात त्यांच्याही कष्टाची जाणीव या मुलांनी नंतर ठेवली पाहिजे
यावेळी रोहीत बरोबरच खडकेवाडी (ता करमाळा)येथील तुषार शेळके या दोघांचे मित्र प्रथमेश माने व नम्रता मोहीते या चौघांचीही केडगाव गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यामध्ये शिवगर्जना लेझीम ग्रुप ,गझेढोल ग्रुप अंजनडोह,हलगी ग्रुप जिंती सहभागी झाले होते यावेळी बोलताना गणेश करे -पाटील म्हणाले की राजपत्रित अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या शिक्षणासाठी हाल अपेष्ट सहन करण्याची वेळ आलेली असते यश मिळाल्यानंतर या मुलांनी त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपली वाटचाल केली पाहिजे. व त्यांच्या सन्मानापासून गावातील इतर मुलांनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी काही साखर कारखान्याची संचालक दिनकर सरडे चिकलठाण विकास सोसायटीचे सदस्य मच्छिंद्र सरडे यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दोलतोडे यांनी केले तर आभार हवालदार रवींद्र लोकरे यांनी मांडले. या कार्यक्रमाला करमाळा पोलीस स्टेशनचे साह्यक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, सुनील कापसे , गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे लावंड सर , श्रीपाल गव्हाणे,शिवाजी बोराडे , बापूसाहेब पवार,दरगुडे सर , त्यांच्यासह या परिसरातील लोक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
सन्मानाला उत्तर देताना नूतन अन्नसुरक्षा अधिकारी रोहित लोकरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी त्याने घरची हलाखीची परिस्थिती आईचे आजारपण शिक्षणासाठी वडिलांना व्याजाने पैसे घेण्याची आलेली वेळ ऐनवेळी नातेवाईक व मेहुण्याने केलेली मदत याविषयी सांगताना उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले व्यासपीठावर बसलेल्या आई-वडिलांच्या डोळ्यातून तर घराघरा अश्रू वाहत होते यावेळी सर्वच लोक भावनिक झाल्याचे दिसून आले शेवटी त्याने गावातील व परिसरातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करणार असल्याचे सांगितले.