विहाळ ग्रामपंचायत उपसरपंचपदी गणेश मारकड यांची बिनविरोध निवड

करमाळा (दि.१६) – विहाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री गणेश बाळासाहेब मारकड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
माजी उपसरपंच सौ. द्रोपदी हरिदास कायगुडे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त पदासाठी १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी फक्त श्री गणेश मारकड यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच सौ. पुजा मोहन मारकड यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

या निवडीनंतर नूतन उपसरपंच गणेश मारकड यांनी त्यांच्या निवडीबद्दल सरपंच व ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले. आपल्याला मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी निवडीनंतर दिली.

या वेळी सरपंच सौ. पुजाताई मोहन मारकड, ग्रामपंचायत सदस्य सौ. द्रोपदी हरिदास कायगुडे, सौ. रेश्मा ज्ञानेश्वर देवकते, सौ. अश्विनी संजय चोपडे, श्री प्रदीप धनराज हाके, जयराम बापू कांबळे, मार्गदर्शक श्री आदिनाथ देवकते,मोहन नवनाथ मारकड,साहेबराव मारकड, महादेव येळे, विलास बंडगर, सुनील चोपडे, नरसिंह देवकते, संतोष मारकड, पोपट बनगर, बापुराव किसवे, गणपत देवकते, अनिल मारकड, आण्णा पाटील, संजय चोपडे, सचिन मारकड, जालिंदर मारकड, शिवाजी चांदणे, बाळु चोपडे, भरतरीनाथ मारकड तसेच ग्रामपंचायत अधिकारी सौ. गाठे आदी मान्यवर उपस्थित होते.



