गंगुबाई शिंदे हॉस्पिटलच्यावतीने संगोबा यात्रेत मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिर आयोजित

करमाळा (दि.२७) : करमाळा येथील मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने संगोबा येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर दोन दिवस चालू असून ३८०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून २५ लाख रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात गरुड कॅन्सर हॉस्पिटल अहमदनगर गांधी फाउंडेशन, कराड येथील नेत्रचिकित्सालय
सुविधा हॉस्पिटल बार्शी, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय करमाळा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी सोलापूर आदी जवळपास सात नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.
तसेच गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कराड यांच्यावतीने नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटण्यात आले. ज्यांच्यावर डोळ्याचे शस्त्रक्रिया करण्याचे आहेत त्यांना मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. लेन्स ही मोफत दिले जाणार आहेत.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कमलादेवी ब्लड बँक,गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेज, गंगुबाई शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर या संस्थेचे कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.
ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया पुणे मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. डोळ्यांचे ऑपरेशन मोतीबिंदू काचबिंदू आदी शस्त्रक्रिया कराड येथील गांधी हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येणार आहेत.ज्यांना सिटीस्कॅन करण्याची गरज निर्माण झाली आहे त्यांची सोय मोफत पुणे येथील रुग्णालयात करण्यात येणार आहे असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय वैद्यकीय उपचारासाठी आधार ठरत असून वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात 2025 हीरक आरोग्य वर्ष साजरे करून महाराष्ट्रातील कोट्यावधी रुग्णांना मोफत उपचार केले जाणार आहे ही संकल्पना अभिमानास्पद आहे असे मत डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांनी व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील जनतेला रुग्णसेवा मिळत आहे. मुंबईत राहून सुद्धा ते करमाळा तालुक्यातील जनतेची काळजी करतात ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे डॉक्टर ओंकार उघडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अल्प दरात सर्व प्रकारची सेवा देणार व सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया अल्प दरात करणार असल्याचा विश्वास दिला. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, पुढील काळात करमाळा तालुक्यातील होणाऱ्या प्रत्येक यात्रेमध्ये अशा प्रकारचे शिबिरांचे आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करून एकनाथ शिंदे यांची रुक्मिणी सेवा प्रत्येक घराघरात करमाळा तालुक्यात पोहोचणार असल्याचे सांगितले.
या शिबिरासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे, गुळसडी येथील उद्योजक अजिंक्य पाटील, शहर प्रमुख संजय शीलवंत, वैद्यकीय कक्ष प्रमुख दीपक पाटणे, ओबीसी आणि आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुशराव जाधव, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, रंभापुर शाखाप्रमुख निलेश चव्हाण,जेऊर शाखाप्रमुख संजय जगताप, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, आजिनाथ वस्ताद कोळेकर, गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल सोमनाथ जाधव,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे आदीजण उपस्थित होते.





