वृक्षलागवडीच्या कार्याबद्दल बागमाळी दुरगुडे यांचा करण्यात आला सत्कार

करमाळा (दि.९) : करमाळा शहरातील माॅं आयेशा अरबी मदरसा व मदरसा ट्रस्ट करमाळा यांच्या वतीने करमाळा नगरपरिषदेचे बागमाळी किरण दुरगुडे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित असलेले करमाळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या शुभहस्ते सन्मान पत्र हार नारळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण राख, माजी नगरसेवक प्रवीण जाधव,खादी ग्रामोद्योग चे अध्यक्ष विजय सुपेकर,अरबी मदरश्याचे विश्वस्त साजीद बेग सामाजिक कार्यकर्ते जहाँगीर बेग,आलीम खान, जावेद शेख आदी च्या उपस्थित करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी तपसे म्हणाले की,किरण दुरगुडे हा करमाळा नगरपरिषदेचा बागमाळी असुन तो वृक्ष लागवड बाबतीत करमाळा शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देऊन त्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त करत आहे व त्याचे संगोपन करण्यास प्रोत्साहन देत आहे त्याच्या या कामाची दखल घेऊन करमाळा येथील माॅं आयेशा अरबी मदरशा च्या विश्वस्तांनी केलेला सन्मान दुरगुडे यांना प्रोत्साहन देणारा ठरेल असे ते यावेळी म्हणाले.
हा सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी मदरश्याचे अध्यक्ष हाजी अतिक बेग, हाजी शकील बागवान,नासीर कबीर आदी जणांनी परिश्रम घेतले.




