गौंडरे शाळेचे शिक्षक उत्तम हनपुडे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

केम(संजय जाधव): गौंडरे (ता. करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील सहशिक्षक उत्तम रंगनाथ हनपुडे यांना ‘युवा महाराष्ट्र फाउंडेशन’ तर्फे आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता.
हा पुरस्कार ‘देव माणूस’ मालिकेतील कलाकार पुष्पा चौधरी यांच्या हस्ते देण्यात आला. श्री. हनपुडे यांना नुकताच एप्रिल महिन्यात ‘महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या पालघर येथील अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला होता. त्यानंतर हा देखील पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हनपुडे सरांनी गावात शिक्षण, स्वच्छता अभियान, महसूल योजना, शेती पूरक व्यवसाय, विवाह जुळवणी आणि विविध उपक्रमांत योगदान दिले आहे. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची ही दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री. हनपुडे यांनी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गावाच्या समृद्धीसाठी विविध योजना राबवल्या. स्वच्छता अभियान, महसूल योजना, तसेच शेती विषयक चर्चा सत्र आणि शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण गावात आयोजित करून, ग्रामविकासात मोलाचे योगदान दिले. सामाजिक भावनेतून कार्य करत त्यांनी वधू-वर केंद्राच्या माध्यमातून एकूण 225 विवाह जुळवले, त्यात 13 पुनर्विवाहांचाही समावेश होता. शालेय उपक्रमात ‘माझी शाळा, सुंदर शाळा’, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान अशा उपक्रमांमुळे पुणे विभागात त्यांच्या शाळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच, शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांच्या हक्कांसाठी त्यांनी सक्रिय भूमिका निभावली






