गौरी पांडव जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम..

कंदर प्रतिनिधी /संदीप कांबळे..
पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त शेळवे तालुका पंढरपूर येथील सनराईज पब्लिक स्कूल च्या वतीने जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत भैरवनाथ वाडी तालुका पंढरपूर येथील वामनराव माने प्रशालेची इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या कुमारी गौरी रेश्मा दादासाहेब पांडव हिने वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
याबद्दल तिला शैक्षणिक साहित्य सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विठ्ठल साखरे कारखान्याचे संचालक समाधान गाजरे सनराइज् पब्लिक स्कूलचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे प्राचार्य उत्तमराव कोकरे प्रताप चव्हाण भीमराव लोंढे ज्योती गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते .या मिळालेल्या यशाबद्दल गौरीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.



