घारगावच्या सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी नवीन विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन केले स्वागत

करमाळा (संदेश प्रतिनिधी)- घारगाव (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १५ जून पासून सुरू झाली आहे. यानिमित्ताने पहिल्या दिवशी अंगणवाडी आणि इयत्ता पहिली मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत घारगावच्या सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांनी ५१ पुस्तके देऊन केले.
यावेळी घारगावच्या सरपंच यांनी स्त्री शिक्षणाविषयी आणि संतांविषयी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यावर संस्कार घडावेत आणि यामधून त्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना गोष्टीची, संतांची अक्षर उजळणी, सचित्र बालमित्र पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी घारगावचे विद्यमान सरपंच लक्ष्मी सरवदे,माजी सरपंच लोचना पाटील, चतुराबाई बारस्कर,
शिक्षिका श्रीमती तांबोळी , अंगणवाडी सेविका शिंगटे मॅडम आशा वर्कर व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.