करमाळा येथील गझलकार नवनाथ खरात यांची वर्धा येथील साहित्य संमेलनात गझल सादरीकरणासाठी निवड
करमाळा – वर्धा येथे आयोजित केलेल्या
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करमाळा येथील प्रसिद्ध गझलकार नवनाथ खरात यांची गझल सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातुन खरात यांची एकमेव निवड झाली आहे.
दि. ३,४ व ५ फेब्रुवारी असे ३ दिवस हे साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे.या साहित्य संमेलनात कविवर्य सुरेश भट गझलकट्ट्यावरील गझल सादरीकरणात नवनाथ खरात यांना आमंत्रित केले आहे. श्री.खरात हे मांजरगाव(ता.करमाळा) चे रहिवासी असून ते श्री आदिनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आदिनाथ नगर (जेऊर) येथे इंग्रजी विषय शिकवितात. खरात यांनी आजपर्यंत विविध साहित्यिक कार्यक्रमात गझल सादर केल्या आहेत.
या निवडी बद्दल श्री आदिनाथ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका रश्मी बागल- कोलते,मकाई सह साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, मांजरगावच्या सरपंच सौ स्वाती पाटील तसेच श्री आदिनाथ विद्यालयाचे प्राचार्य श्री माने, स्व दिगंबरावजी बागल विद्यालय कुंभेज चे मुख्याध्यापक श्री. पाटील ,प्रगती विद्यालय मांगी च्या मुख्याध्यापिका सौ अनुपमा बागल( देवकर) तसेच करमाळा तालुक्यातील सर्व शिक्षक वर्गातून व साहित्यिकांकडून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.