प्रफुल्ल शिंदे यांच्याकडून करमाळा येथील हनुमान मंदिरास एलईडी बोर्ड भेट - Saptahik Sandesh

प्रफुल्ल शिंदे यांच्याकडून करमाळा येथील हनुमान मंदिरास एलईडी बोर्ड भेट

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील रहिवासी व व्यावसायिक प्रफुल्ल शिंदे यांच्यावतीने करमाळा शहरातील छत्रपती चौक येथील पुरातन हनुमान मंदिरास एलईडी बोर्ड भेट देण्यात आला आहे. याआधी देखील त्यांनी किल्ला वेस येथील हनुमान मंदिर, सावंत गल्ली येथील हनुमान मंदिर, तसेच वेताळ पेठ येथील श्रीराम मंदिर या मंदिराना एलईडी बोर्ड भेट दिला आहे. तसेच त्यांनी करमाळा शहरातील लोकमान्य टिळक मंडळाच्या गणपतीस चांदीचा टोप देखील त्यांनी भेट दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

यावेळी योगेश सोरटे ,प्रसाद निंबाळकर सूरज ईंदुरे केतन ईंदुरेबबलु पठाण विशाल गायकवाड,आकाश सिंधी,मनोज कुलकर्णी,आकाश जाधव सावरे,गजानन राक्षे, दत्तात्रय सरडे ,सागर गायकवाड, करण काळे,चैतन्य पाटील,गोट्या डोके, अक्षय शेळके,प्रशांत शिंदे, प्रदीप शिंदे, विनायक कांबळे. सागर कांबळे. विनायक कांबळे. अक्षय झाकणे. सागर जगताप आदीजन उपस्थित होते.

याआधी वेताळ पेठ करमाळा येथील श्रीराम मंदिरास शिंदे यांनी एलईडी बोर्ड दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!