भोसे जि.प.शाळेला पाटील परिवारातर्फे स्मार्ट टीव्ही भेट
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – भोसे (ता.करमाळा) येथील स्व.गुलाबराव ईश्वर पाटील यांच्या ३० ऑक्टोबर रोजी असलेल्या ७७ व्या जयंतीनिमित्त गावातील जिल्हा परिषद शाळेला पाटील परिवारातर्फे स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. तसेच मुलांसाठी शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रा. गणेश भाऊ करे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी सुग्रीव नीळ, केंद्र प्रमुख श्री.रमाकांत गटकळ, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात आयुष्यभर झाडांची सेवा करणार्या आणि फळबागा मध्ये रममाण होणार्या, शेतीला प्रयोगशाळा बनविणारा अवलिया स्व. गुलाबराव पाटील यांच्या आठवणी जागवल्या आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच हा वारसा पाटील परिवाराने पुढे चालू ठेवला याबद्दल आभार व्यक्त केले.
प्रा. दिलीप गुलाबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्री. गणेश भाऊ करे पाटील यांनी आणि डॉ सुनील अडसूळ यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक श्री पोपट गुलाबराव पाटील यांनी या उपक्रमाचे उद्दिष्ट सांगून सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी श्री सुधीर गुलाबराव पाटील, श्री अरुण ईश्वर पाटील, सौ. वंदना अरुण पाटील, श्री. शहाजी पाटील, श्री अजिनाथ ईश्वर पाटील,श्री रमेश पाटील, श्री. चित्तरंजन पाटील, श्री अशोक अडसूळ, ग्रामसेवक राम बडे, श्रीमती सुनीता वारे, श्री गोविंद सुरवसे, श्री आप्पा वाघमोडे (ग्रामपंचायत सदस्य पांडे) , श्री स्वप्निल सुरेश अडसूळ,श्री दत्तू पवार,श्री बापू पवार उपस्थित होते. शाळेतील शिक्षक श्री हौसराव काळे आणि जाधव यांनी आभार मानले.
स्व. गुलाबराव पाटील यांचे 16 नोव्हेंबर 2020 रोजी न्यूमोनिया आजाराने निधन झाले होते.