नवभारत स्कूल मध्ये बालिका दिन साजरा

करमाळा (दि.४) :भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा बालिका दिन व महिला शिक्षण दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवरश्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स या शाळेमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ रागिनी कोंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ रेश्मा दोशी, करिष्मा दोशी व सौ.घोडके या होत्या. प्रथम अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवभारत स्कूल मध्ये सर्व महिला शिक्षिका असल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सौ देवी यांनी सर्वांना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका सौ अश्विनी क्षीरसागर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सविता पवार यांनी मानले.




