‘कमलाभवानी देवी’ मंदिरात गोमुख येथे ‘सोन्याचे मनी मंगळसुत्र’ सापडले ; ज्याचे असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथील श्री देवीचामाळ श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरामध्ये गोमुख येथे सोन्याचे मनी मंगळसुत्र सापडले आहे, ते मनीमंगळसुत्र मानकरी रमेश येळवणे यांना गोमुख मध्ये सापडले आहे.
त्यांनी श्री कमलादेवी मंदिर समितीकडे जमा केले आहे. ज्या कोणाचे हरवले आहे त्यांनी कृपया श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समिती कार्यालय येथे संपर्क साधावा; असे आवाहन अध्यक्ष सोमनाथ चिवटे व सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्तांनी केले आहे.