केम येथील गोमाता मंदिर गोशाळेत बैल पोळा उत्साहात साजरा
केम (संजय जाधव) – गोमाता मंदिर केम यांच्या वतीने कपिला,खिल्लार,खोंड,भैरू यांची बैल पोळा निमीत्त गावातून मिरवणूक काढण्यात आली.
या निमित्ताने गावातील महिला भगिनी यांनी औक्षण करत भाळी केम गावचे प्रसिद्ध कुंकू लावून टिळा लावला त्याचबरोबर खिल्लार बैलांची आवड असणारे अनेक लहान मुले ते मोठे व्यक्ती तसेच वयस्कर व्यक्ती यांनी गोमाता मंदिर केम गोसेवक परमेश्वर तळेकर यांच्या कपिला खिल्लार खोंड भैरु समवेत आपले फोटो काढून नंदीचे दर्शन घेतले. परमेश्वर तळेकर यांच्या कपिला खिल्लार खोंड भैरु याचा जंगी मिरवणूक काढत गाव वेशीतून बाहेर येत प्रत्येक व्यक्तीने आपला आनंद व्यक्त केला.
आजच्या आधुनिक युगात बैलांची शेती बंद पडली आहे परंतु युगाण युगे हेच सत्य सिद्ध होत आहे की बैलाशिवय शेती नाही शेती शिवाय अन्न नाही अशी भावना परमेश्वर तळेकर यांनी यावेळी व्यक्त केली. गावातून मिरवणूक तळेकर यांच्या घरी आल्यावर बैलांचे पाय धुऊन पुजा केली व नंतर बैल पोळा पारंपारिक पद्धतीने विधिवत पूजा करून लग्न सोहळा समारंभ संपन्न झाला व त्यानंतर कपिलाला परमेश्वर तळेकर यांच्या कुटुंबाने नैवेद्य दाखवला.