केममधील अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीचे ग्रामपंचातीस निवेदन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात यावे अशा तक्रारीचे निवेदन मराठी पत्रकार न्याय संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष प्रविण मखरे यांनी केम ग्रामपंचायतीस दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केम येथील काही खाजगी रुग्णालय चौकाच्या बरोबर मधोमध असल्याने केम येथील आणि आसपासच्या काही खेड्यांमधील रुग्णांना येथील रुग्णालयामध्ये जाताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. गांधी चौक, भाजी मंडई येथील काही व्यावसायिकांनी आपली दुकाने वाढवून व काहींनी पत्र्याचे छत आणि दुकानाचे कट्टे वाढवून रस्त्याचा निम्मा भाग व्यापाला आहे. काही गॅरेज चालविणाऱ्यांनी तर गाड्या रिपेरिंग करण्यासाठी स्वतःची मनमानी करत गाड्या रस्त्यावरच रिपेरिंग चालू केली आहे. या सर्व गोष्टी चा येथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे हा सर्व मनमानी कारभार बंध करण्यात यावा व येथील सर्व अतिक्रमान हटविण्यात यावे अन्यथा आम्हाला पुढील पाउल टाकण्यास भाग पाडु नये अस इशारा देखील पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण मखरे यांनी ग्रामपंचायतला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!