उद्या जरांगे-पाटील यांची तालुक्यातील दिवेगव्हाण येथे भव्य सभा

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटिल यांची येत्या शनिवारी (दि.२३ मार्च) सायंकाळी चार वाजता करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथे जाहिर सभा होणार आहे.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील दिवे गव्हाण येथील नव्यानेच बांधलेल्या श्री विठ्ठल रूक्कमिणी मंदिराजवळील ७० एकर क्षेत्रावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची जोरदार तयारी झाली आहे हि सभा लोकसभा निवडणूकिच्या तोंडावर होत असल्याने जरांगे पाटिल काय बोलणार या कडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची दखल घेऊन शासनाने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले पंरूतु सगेसोयऱ्याचा अध्यादेश मंजुरी दिली नाही. हि कायदेशीर मंजुरी मिळावी हि मराठा समाजाची आग्रही मागणी आहे. उद्याच्या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार ? माढा लोकसभा मतदार संघातून मराठ्यांचे उमेदवार उभे राहणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.


