'नेटाफिम ठिबक' दालनाचे जेऊर येथे भव्यउद्घाटन.. - Saptahik Sandesh

‘नेटाफिम ठिबक’ दालनाचे जेऊर येथे भव्यउद्घाटन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : केएफसी ॲग्रो सर्विसेस करमाळा यांच्यावतीने जेऊर (ता.करमाळा) येथे नेटाफिम ठिबक, सह्याद्री टिशू कल्चर केळी रोपे व चोपिंग बनाना केळी मोडायचे मशीन, माती – पाणी व देठ परीक्षण केंद्राचे उद्घाटन माजी सभापती अतुल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.


याप्रसंगी अतुल पाटील यांनी बोलताना सांगितले कि,सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये ‘शेती’चा विचार आपण ठिबक विना करू शकत नाही. तर प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक सिंचन करणे काळाची गरज बनलेली आहे अशा विविध विषयावर त्यांनी सविस्तर आपले मत व्यक्त केले. यावेळी नेटाफिम कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी मल्लिनाथ जट्टे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना नेटाफिम कंपनी च्या सर्व प्रोडक्टची माहिती दिली.

यावेळी दयानंद वीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी अतुल पाटील, तुषार निकम (सेल्स इंजिनिअर, नेटाफिम), मल्लिनाथ जट्टे (जिल्हा व्यवस्थापक अधिकारी, नेटाफिम), बापूराव तनपुरे (माजी सरपंच वरकटणे), योगेश कर्णवर (ग्रामपंचायत सदस्य जेऊर), संजय तनपुरे (ग्रामपंचायत सदस्य वरकटणे), अनिल कोकाटे (माजी सरपंच वरकटने), हनुमंत पाटील (ग्रामपंचायत सदस्य वरकटणे)श्री सिद्धेश्वर मस्कर (केळी व्यापारी), प्रशांत पाटील केळी बागायतदार व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!