तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचे घवघवीत यश
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती या प्रकारात घवघवीत यश मिळविले आहे. शनिवारी व रविवारी जेऊर याठिकाणी संपन्न झालेल्या या कुस्तीस्पर्धेत उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्व गटांमध्ये आपला दबदबा निर्माण करून यश संपादन केले.
या स्पर्धेत कु. प्रेम नागनाथ खताळ (इयत्ता 12 वी) या विद्यार्थ्याने 19 वर्षाखालील स्पर्धेत 97 किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला. कु. महेश बळीराम खताळ (इयत्ता 12) वी या विद्यार्थ्याने 19 वर्षाखालील 70 किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला. कु.सुजित आण्णासाहेब शिंगाडे (इयत्ता 12 वी) या विद्यार्थ्याने 17 वर्षाखालील 82 किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला. कु.विजय कैलास कांबळे (इयत्ता 12 वी) या विद्यार्थ्याने 19 वर्षाखालील 65 किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांची पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु. सुमित संभाजी तळेकर (इयत्ता 11 वी) या विद्यार्थ्याने 17 वर्षाखालील 65 किलो वजनगटात द्वितीय क्रमांक मिळविला. कु.सुरज भैरवनाथ टकले (इयत्ता 11 वी) या विद्यार्थ्याने 17 वर्षाखालील 80 किलो वजनगटात दुसरा क्रमांक मिळविला. कु.चैतन्य श्रीहरी तळेकर (इयत्ता 10 वी) या विद्यार्थ्याने 17 वर्षाखालील 55 किलो वजनगटात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
या स्पर्धेत श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजने मिळविलेल्या यशाबद्दल मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्राचार्य श्री सुभाष कदम, शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर व सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.