कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांना पोथरे ग्रामस्थांकडून अभिवादन -

कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांना पोथरे ग्रामस्थांकडून अभिवादन

0
डॉ. बाबा आढाव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना ज्येष्ठ हमाल आजीनाथ कडू, आणि दत्तू झिंजाडे तसेच उपस्थित युवकवर्ग

करमाळा : ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकरी वर्गाचे नेते दिवंगत डॉ.बाबा आढाव यांना पोथरे ता करमाळा येथे ग्रामस्थांचे वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी जुने हमाल आणि युवक उपस्थित होते.

डॉ. बाबा आढाव यांच्या प्रतिमेला करमाळा हमाल पंचायतचे माजी उपाध्यक्ष आजीनाथ कडू, आणि ज्येष्ठ हमाल दत्तू झिंजाडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ हमालांनी बाबा आढाव यांचेसोबत केलेले आंदोलन आणि हमाल अधिवेशनांच्या आठवणी सांगितल्या.पूर्वी हमाल वर्गाला होत असणारा त्रास कमी करण्याचे काम बाबा आढाव यांनी केले.

हमालांना त्यांच्यामुळे न्याय मिळाला अशा भावना उपस्थित जुन्या हमालांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी, संतोष वाळुंजकर,धनंजय शिंदे, अकबर शेख, झुंबर कडू, शहाणू झिंजाडे, पाराजी शिंदे, संजय पुराणे, मारुती लाढाणे, अण्णा झिंजाडे, बाळासाहेब खराडे, संदीप ठोंबरे, आदि उपस्थित होते. प्रास्ताविक हरिभाऊ हिरडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राज झिंजाडे यांनी मानले.

पूर्वी हमालांना मोठे धान्याचे पोती पाठीवर उचलावी लागायची. ती पोती एक क्विंटल वजनाची असायची त्यामुळे खूप त्रास व्हायचा.अनेक हमालांना त्यामुळे शारीरीक व्याधी होत असायच्या. तसेच व्यापारी वर्गाची मनमानी ही असायची. या सर्वांतून बाबा आढाव यांनी संघटीत करून न्याय मिळवून दिला.

आजिनाथ कडू, माजी उपाध्यक्ष करमाळा तालुका हमाल पंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!