उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित क्षेमराजा शाॅपिंग सेंटरचे भुमीपूजन समारंभ संपन्न -

उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित क्षेमराजा शाॅपिंग सेंटरचे भुमीपूजन समारंभ संपन्न

0

केम (संजय जाधव) – येथील श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री उत्तरेश्वर विद्यार्थी वस्तीगृहाच्या पाठीमागील जागेत क्षेमराजा शापिंग सेंटर भुमिपूजन समारंभ मोठया उत्साहात पार पडला तिसऱ्या सोमवारचे निमित्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी सरपंच सौ सारिका कोरे या होत्या. या सेंटरचे भुमीपूजन जनत सहकारी बॅंकेचे चेअरमन दिलीपदादा तळेकर व श्री उत्तरेश्वर देवस्थान चे चेअरमन दादासाहेब गोडसे यांच्या हस्ते श्री उत्तरेश्वर   महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्ताविक रंदवे गुरूजी यानी केले या वेळी श्री  उत्तरेश्वर देवस्थानचे  विश्वस्त मनोज सोलापूरे यानी या शाॅपिंग सेंटरची रूपरेषा सांगीतली व हे गाळे तीन वर्षाच्या करारावर प्रथम देण्यात येतील  हे गाळे लिलाव पध्दतीने  दिले जातील याचे प्रसिध्दी करण केले जाईल या मध्ये पारदर्शक पणा राहणार आहे तसेच या शाॅपिंग सेंटरला क्षेमराजा का नाव दिले याची माहिती सांगितली.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीपदादा तळेकर  म्हणाले कि श्री उत्तरेश्वर देवस्थान जो उपक्रम राबविला त्याचे मी स्वागत करतो या व्यापारी संकुलामुळे तरूणाना रोजगार मिळणार आहे तसेच आपल्या  गावच्या विकासासाठी याचा हातभार लागणार आहे या व्यापारी संकुलासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यानी दिले  तसेच  माजी आमदार नारायण पाटिल याच्या प्रयत्नातून आमदार रणजितसिंह मोहिते पाटिल यानी या देवस्थानला तीर्थ क्षेत्र ब दर्ज मिळवून दिला  त्यासाठी पाघ कोट रूपये मंजूर झाले येत्या महिनाभरात या देवस्थान विकास कामे होणार आहे असे सांगितले  या वेळी   सदस्य नागनाथ तळेकर डाॅ अंकुश तळेकर यानी आपले मनोगत व्यक्त केले.


या वेळी महंत जयंत गिरी महाराज अच्युत काका पाटिल सागर दोंड,विष्णू पारखे  आणा कांबळे संदिप तळेकर महावीर तळेकर भाऊसाहेब बिचितकर मोहन दोंड, शेखर गाडे राहुल कोरे बाळासाहेब देवकर विष्णू अवघडे अनवर मुलाणी विजय तळेकर दादा साहेब येवले अरूण वासकर  भैरू शिंदे बापुराव नेते तळेकर सोमनाथ यादव संजय दोंड   पुष्पा शिंदे, अनिल ननवरे माउली तळेकर  मुनीराज पोळके गोरख पारखे  ब्राम्हण विजय कुलकर्णी,आपा ननवरे सागर कुरडे   नागेश शेटे काका दगडे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!