करमाळा तालुका प्राथ. शिक्षक सह. पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न
करमाळा (दि.१४) – करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी संस्थेचे सभासद उपस्थित होते.
सदर संस्थेची स्थापना यशवंत तुळशीराम माने उर्फ मंगवडे गुरुजी यांनी १९४० साली केली होती. आज या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे. सदर संस्थेचे बांधकाम वापरण्यास अयोग्य असल्याचे नगरपालिकेने सूचविले होते. त्यामुळे संस्थेने व्यावसायिक दृष्टीकोन समोर ठेवून बांधकाम करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
यावेळी चोपडे गुरुजी, बाळासाहेब गोरे, भारत पांडव, भारत शिंदे, प्रताप काळे, अरुण चौगुले, चेअरमन आदिनाथ देवकते, व्हाईस चेअरमन तात्यासाहेब जाधव, सचिव अजित कणसे, साईनाथ देवकर, सतीश चिंदे, हनुमंत सरडे, वैशाली महाजन, पुनम जाधव, वसंत बदर, दिपक जाधव, रमेश नामदे, बाळासाहेब दुधे यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.