गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत बैलपोळा उत्साहात साजरा

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : येथील गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत २२ ऑगस्ट रोजी पारंपरिक बैलपोळा उत्सव मोठ्या भक्तिभाव, श्रद्धा आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. ग्रामीण संस्कृतीचा गंध आणि एकात्मतेचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.”

या प्रसंगी सर्व गोमातेला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. डॉ. महेश नगरे यांनी गोशाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत गोमातेचे महत्व पटवून दिले. संघाचे प्रचारक यांनी आपले विचार मांडले, तर संस्थेचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर यांनी उपस्थितांचे स्वागत करून गोशाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

संस्थेचे सदस्य जगदीश शिगची यांनी स्व. गोवर्धनजी शिगची, स्व. कांतिभाई संचेती तसेच श्रेणिक खाटेर व मित्रपरिवार यांच्या चर्चेतून या गोशाळेची निर्मिती कशी झाली, याची माहिती उपस्थितांना दिली. ह.भ.प. अमोल महाराज कालदाते यांनी कीर्तनातून भक्तिमय वातावरण निर्मिले.

पोपटराव कालदाते व त्यांचा परिवार गोशाळा स्थापन झाल्यापासून गोसेवा करत असून सध्या येथे 90 गायींची उत्तम सेवा सुरू आहे. या कार्यक्रमात विशेषतः सौं. ज्योतीताई मुथा यांना “बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड – हिंदुस्थान बुक ऑफ रेकॉर्ड” मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर व सदस्यांनी सन्मानित केले.

यावेळी एपीआय शीतल म्हस्के विशेष उपस्थित राहून गोपालन संस्थेचे कौतुक केले. तसेच मा. नगराध्यक्ष आमोद संचेती, डॉ. परदेशी, डॉ. नगरे, डॉ. धुमाळ, पत्रकार दिनेश मडके, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, पत्रकार ठाकुर यांच्यासह संतोष शेठ गुगळे, चंद्रकांत कटारिया, रमेश कटारिया, रमण कटारिया, अमृत कटारिया, विकास कटारिया, चेतन किंगर, नारायण पवार, विजय मंडलेचा, रसिक मुथा, प्रकाश मुनोत, संतोष कटारिया, अनिल सोळंकी, रितेश कटारिया, विक्रांत मंडलेचा, मनोज पितळे, शंकर रासकर, राजेंद्र कटारिया, आदेश ललवणी, अजिंक्य महाजन, दिनेश मुथा, अक्षय मंडलेचा, अभय शिंगवी, गणेश बोरा, संजय लुनिया, चरण परदेशी, नितीन दोशी, वैभव दोशी, आशिष बोरा, तसेच महिला व कुटुंबीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यामुळे गोपालन संस्थेचे सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक योगदान अधोरेखित झाले.

