तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत गुरुकुल शाळेचे खेळाडूंचे यश

करमाळा : सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत करमाळा तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा भारत हायस्कूल, जेऊर येथे ८ व ९ सप्टेंबर रोजी पार पडल्या. या स्पर्धेत गुरुकुल पब्लिक स्कूल, करमाळा येथील दोन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

१४ वर्षांखालील मुलांच्या ४४ किलो वजनी गटात ओम रवी जाधव यांनी चार फेऱ्या पार करून तृतीय क्रमांक पटकावला. तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या ६० किलो वजनी गटात शुभम जयराम सोरटे यांनीही चार फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला.

या यशात क्रीडा शिक्षक सागर शिरस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष भोगे, सचिव सौ. भोगे, तसेच शिंदे व पवार यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत करमाळा तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला.



