श्री ऊत्तरेश्वर मंदिरात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

केम (संजय जाधव ): येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात पार पडले.

सकाळी आठ वाजता मंदिरातील श्री ऊत्तरेश्वर देवस्थान तसेच अन्य देवस्थानांना व समाधींना विधीवत अभिषेक करण्यात आला. यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. स्वप्नील महाराज पाथुडी यांचे भावपूर्ण कीर्तन झाले. बरोबर १२ वाजून ५ मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली.

कार्यक्रमानंतर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गुरूपौर्णिमा निमित्त महंत जयंतगिरी महाराज यांचे शिष्य व भाविकांनी विधीपूर्वक पूजन करून दर्शन घेतले.


या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रामस्थ व श्री ऊत्तरेश्वर भक्तगण यांनी परिश्रमपूर्वक पार पाडले.




