हातभट्टी दारू करणाऱ्यास रंगेहाथ पकडले – १४ हजार ७०० रू. चा माल जप्त..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : हातभट्टी दारू तयार करत असताना एकास पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार ९ जुलैला सायंकाळी साडेपाच वाजता हिंगणी (ता. करमाळा) येथे घडला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश लालासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की हिंगणी येथे हातभट्टी दारू निर्मिती होत असल्याची माहिती समजल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गेलो असता, हिंगणी येथे पप्पू उर्फ नागेश प्रभाकर पिंपळे (रा. केत्तूर नं. २) हा त्याच्या शेतात बेकायदेशीर गावठी दारू व त्यासाठी लागणारे रसायन तयार करत असताना आढळून आला.
त्याच्याकडे पाच हजार रूपये किंमतीचे शंभर लिटर गुळमिश्रीत रसायन तसेच चार हजार पाचशे रू. किंमतीचे ९० लिटर गुळमिश्रीत रसायन तसेच चार हजार आठशे रूपयाचे ६० लिटर हातभट्टी दारू भरलेले कॅन्ड व चारशे रूपयाच्या नवसागर वड्या असा १४ हजार ७०० रूपयाचा माल सापडला असून तो जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.