कंदर येथील बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये आनंदी बाजार संपन्न..

कंदर/ संदेश प्रतिनिधी : संदीप कांबळे…
कंदर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान समजण्यासाठी कंदर तालुका करमाळा येथील श्री बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार्य उद्योग समूहाचे बालाजी पाटील व प्रमुख पाहुणे गणेश जगताप ,काका शिंदे,संभाजी लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी या शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला, विविध प्रकारचे माळवे, फळे, स्टेशनरी ,किराणा ,वडापाव ,पाणीपुरी भेळ, इडली, आईस्क्रीम आदी विकण्यासाठी आणले होते. पालकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आनंदी बाजारातून एकूण उलाढाल 35 हजार 234 झाली. यावेळी कविटगावचे उपसरपंच भाऊसाहेब जगदाळे, रिकेश नलवडे, हनुमंत शिंदे, प्रविण बसळे, सचिन तळे,सुहास नवले,गणेश जगताप, सचिन जाधव, पत्रकार संदीप कांबळे, पोलीस पाटील धन्यकुमार सुरवसे,सि.ए.महादेव बसळे, कुलदीप पाटील, आदी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव राजकुमार राऊत, मुख्याध्यापक जाकिर मुलाणी, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. निवेदन गणेश जगताप यांनी केले.सुत्रसंचालन सुशांत शिंदे तर प्रस्ताविक सुरज पवार यांनी केले.
