हर्षालीताई नाईकनवरे यांची भाजपाच्या करमाळा तालुका महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड

करमाळा : शेटफळ (ता.करमाळा) येथील जिजामाता महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षालीताई नाईकनवरे यांची भाजपाच्या करमाळा तालुका महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या हस्ते बागल कार्यालय करमाळा येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी करमाळा भाजपा ग्रामीण मंडल चे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सचिन पिसाळ मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर भाजपा ग्रामीण मंडल उपाध्यक्ष राहुल गोळे,शुभम बंडगर साधना खरात यांच्या सह तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ.नाईकनवरे या शेटफळ येथील जिजामाता महिला बचत गटाच्या अध्यक्ष असून गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. पुढील काळात भाजपाचा विचार ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण रश्मी दिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणार असल्याचे त्यांनी निवडून नंतर मनोगत केले.



