आठ दिवसांच्या बाळाला घेऊन दिली परीक्षा-मिळवला जिल्ह्यात दुसरा क्रमांक - Saptahik Sandesh

आठ दिवसांच्या बाळाला घेऊन दिली परीक्षा-मिळवला जिल्ह्यात दुसरा क्रमांक

करमाळा (संदेश प्रतिनिधी) –  सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या 16 जून 2024 रोजी परीक्षा झाल्या होत्या. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात जेऊर च्या मयुरी घोळवे-पोटे या खुल्या गटातून जिल्ह्यात दुसरा क्रमांकाने पास झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या 8 दिवसाचे बाळ घेऊन परिक्षा ही दिली होती.

त्या 9 जून रोजी बाळांत झाल्या ,त्यांना मुलगा झाला,त्यानंतर 8 दिवसांतच त्यांनी 16 जुन ला आरोग्य विभागाची परीक्षा दिली . यावेळी सुरवातीला परिवाराचा विरोध होता,तो डावलून कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता त्यांनी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रोत्साहन दिले, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता.त्यांच्या या यशानंतर ग्रामसुधार समितीने विशेष अभिनंदन केले आहे.

सदर प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रे व अटी दिलेल्या आहेत –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!