भांडण सोडविण्यास गेलेल्याला चौघाकडून कोयत्याने मारहाण
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात भांडण सोडविण्यास गेलेल्या व्यक्तीला लाकडी दांडक्याने, कोयत्याने, दगडाने व लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार १४ जुलैला दुपारी एक वाजता करमाळा येथे मौलालीमाळावर घडला आहे.
या प्रकरणी संजय सुभाष माने (रा. मौलालीमाळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १४ जुलैला दुपारी एक वाजता शेजारी असणारे अनिल देवकर व अनिकेत वीटकर यांची भांडणे सुरू असताना ती सोडविण्यासाठी मी गेलो त्यावेळी अनिकेत वीट, गोविंद वीटकर, रतन वीटकर, सागर सुरवसे (सर्व रा.मौलालीमाळ) या सर्वांनी मला कोयत्याने, लाकडी दांडक्याने, लोखंडी गजाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे हे करत आहेत.
याच प्रकरणी अनिकेत शिवाजी वीटकर याने विरूध्द फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की १४ जुलैला दुपारी सव्वाएक वाजता मौलालीमाळ येथील लक्ष्मीआई मंदिराच्या चौकात थांबलो असताना अनिल देवकर, संजय माने, अक्षय गुंजाळ, सोन्या देवकर यांनी दगडाने, लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.