केम : गणेशोत्सवानिमित्त आयोजित आरोग्य शिबीरात १८० नागरिकांची तपासणी

केम(संजय जाधव): केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जाणता राजा स्पोर्टस् क्लब गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त समुदाय आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, शुगर, घसा व बी.पी. तपासणी करण्यात आली. तसेच अवयव दानाबाबत जनजागृती करण्यात आली. एकूण १८० गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
तपासणीसाठी डॉ. सुनील उबाळे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निलेश कुबेर यांनी काम पाहिले. औषध व गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. यासाठी आरोग्य सेवक विकास डावखरे, दत्ता कावळे व नांदे यांनी मदतनीस म्हणून काम केले.

या वेळी समीर तळेकर, राजेश तळेकर, सचिन तळेकर, बबलू सुरवसे, अक्षय तळेकर, प्रकाश तळेकर, आदित्य चव्हाण, आयर्न तळेकर, शंभू तळेकर, सुयश तळेकर, ओंकार जाधव, दत्ता तळेकर, चिंटू कांबळे व वीरेन सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

जाणता राजा स्पोर्टस् क्लब गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या समुदाय आरोग्य शिबिराचा १८० नागरिकांनी लाभ घेतला. हा स्तुत्य उपक्रम इतर मंडळांसाठी आदर्श ठरेल.
— सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे, केम

