केम येथे डॉक्टर्स डे निमित्त आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचा केला गेला सन्मान
केम (संजय जाधव) – केम येथील रक्तदाते संघटना व श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व डॉक्टर्स परिचारक,पॅथाॅलाजी लॅब मधील कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
सुरूवातीला ग्राम दैवत श्री उत्तरेश्वर बाबांच्या प्रतिमेचे पुजन दादासाहेब गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्ताविक नामदेव रंदवे गुरूजी यांनी केले. या सत्कार प्रसंगी डॉ अंकुश तळेकर म्हणाले देवांचे राजवैद्य धन्वंतरिंचा चा दाखला देत रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असून ती कधीही निष्फळ ठरत नाही कधी मित्रत्व कधी समाजऋण कधी अर्थलाभ मिळेल असे सांगितले रुग्ण आणि वैद्य दोघांनी ही एकमेकांना समजून उमजून घेतले तर होणारे वाद विवाद टाळता येतील असे मत त्यानी मांडले.
या वेळी डाॅ, योगेश कुडें,ताकमोगे,संदिप सुर्वसे, विश्वास, डाॅ,सुजाता जांभळे, सौ नंदा तळेकर अनिता कुडें, सौ सुर्वे,,सौ शितल घायाळ डाॅ निलेश,दत्तात्रय कावळे, दिपक पाटिल, अभिजीत बागडे, दत्ता काळे,शितल तळेकर, चेअरमन दादासाहेब गोडसे, विश्वस्त मनोज सोलापुरे, राहुल कोरे माजी जि.प. अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, विजय तळेकर,दादा येवले, गोरख नाना तळेकर,रमेश तळेकर, बाळु ननवरे संजय दौंड,सोनू गुरव चंद्रकांत तळेकर दत्तात्रय कुलकणीं दगडफोडे आदि उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंदवे यानी केले तर आभार भैरू शिंदे यांनी मानले.
डॉक्टर्स डे निमित्त केम येथील खाजगी डाॅ यांनी रात्रीच्या वेळी उठून रुग्णाना सेवा ध्यावी येथील डाॅ रात्रीच्या वेळी रुग्णाला उपचार करण्यासाठी टाळा,काळ करतात त्यामुळे एखाद्या पेशंटला खाजगी गाडी करून उपचारासाठी बाशीं कुडूंवाडि इंदापूरच्या न्यावे लागते त्यामुळे वेळ जातो वेळीच उपचार न मिळाल्याने पेशंट दगावण्याची शक्यता आहे तरी आम्हा ग्रामस्थांची या दिना निमित्त एकच अपेक्षा येथील खाजगी डाॅ क्टरने रात्रीच्या वेळी उठून रुग्णाची सेवा करावी आपणाला रूग्णाचा आशीर्वाद मिळेल.
– वर्षाताई चव्हाण, तालुका प्रमुख, उ.बा. ठा. शिवसेना महिला आघाडी