कंदर सोसायटीवर शेतकरी विकास सहकार पॅनलचे वर्चस्व..
कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे…
कंदर : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी विकास सहकार पॅनेल ने १३ पैकी ९ जागा जिंकत आपले वर्चस्व स्थापित केले. तर कण्वमुणी शेतकरी विकास पॅनलला केवळ चार जागा वर समाधान मानावे लागले.
१३ जागांसाठी रविवार ९ रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत मतदार प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मतमोजणी प्रारंभ झाला सायंकाळी आठ वाजता सविस्तर निकाल जाहीर करण्यात आला.
ही निवडणूक एकतर्फी न होता दोन्ही गटात चुरशीने झाली आहे अशी दिसून आले आहेत यामध्ये काही ठिकाणी धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. सोसायटीचे विद्यमान चेअरमन हरिभाऊ गरड यांना पराभवाचा धक्का बसला आहे .तर महिलांमध्ये सुप्रिया यादव या केवळ एका मताने विजयी झाल्या आहेत. विजयी उमेदवार आणी त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे नवनाथ भांगे- 429,सागर शिंदे- 424,विलास माने- 409, विजयसिंह नवले-431, राजकुमार पराडे- 413 ,बबन लोकरे-422, अण्णासाहेब पवार-405,नितिन भांगे- 412,रावसाहेब जाधव-435,रामा भगत- 440,बाळासाहेब सुरवसे-440, ऊर्मिला जगताप-418 ,सुप्रिया यादव-414, एकतर्फी वाटणारी ही निवडणूक लक्षवेधक ठरली. निवडणूक निकालानंतर जल्लोष साजरा करण्यात आला.गुलालाची उधळण करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप तिजोरे यांनी काम पाहीले. यावेळी अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता..