वापरायला दिलेल्या मोटारसायकलचे अपहरण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : वापरायला दिलेली मोटारसायकल गड्याने तिचे अपहरण करून स्वत:च्या गावी नेली आहे. हा प्रकार बोरगाव (ता. करमाळा) येथे २४ जुन २०२३ रोजी दुपारी तीन वाजता घडला आहे.
या प्रकरणी चंद्रकांत रमाकांत देशमाने रा. बोरगाव यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आमच्या शेतात राजकुमार रामदास तिवारी रा. बुधवारपेठ, उमरड, नागपूर हा कामाला होता. कामाला असताना त्याला वापरण्यासाठी हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल एमएच १३ एस ८४३४ ही मोटारसायकल दिली होती.
२४ जुन २०२३ ला दुपारी तीन वाजता हा गडी ही मोटारसायकल घेऊन गायब झाला आहे. त्याने सदरच्या मोटारसायकलचे अपहरण केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.


