शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते सन्मान…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालय चिखलठाण येथील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती धारक विदयार्थी व सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सन्मान आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.
रस्त्यांच्या शुभारंभाप्रसंगी या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड यांनी या विद्यार्थ्यांचा सन्मान घडवून आणला. प्रत्येक विद्यार्थ्याला मानाची शाल, सन्मानचिन्ह व आमदार संजयमामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त वही भेट असे या सन्मानाचे स्वरूप होते.
धनश्री रमेश जाडकर,आदर्श ज्ञानेश्वर बोराडे हे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तसेच सारथी शिष्यवृत्ती धारक श्रावणी मारुती गुटाळ,जानवी सुरेश गुटाळ,प्रणाली संतोष सरडे,स्नेहल शहाजी गलांडे,अक्षदा विकास सरडे,प्रणवी प्रमोद गव्हाणे,प्रणाली दिलीप सरडे,साक्षी अंगद ढवळे,प्रतिक्षा महादेव पाटील,शिवराज शरद पवार,शंभुराजे आत्माराम डोंगरे,शंभुराजे श्रीकृष्ण सुपेकर,आदर्श शंकर पाटील या विद्यार्थ्यांचा सन्मान आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला . शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रति वर्ष नऊ हजार सहाशे रुपये असे चार वर्षासाठी प्रति विद्यार्थी 38 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहेत तर आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 8000 ते तीन वर्ष प्रत्येकी 24 हजार रुपये मिळणार आहेत.



