कोर्टी येथे कर्तुत्वान महिलांचा सन्मान व बालविज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.. - Saptahik Sandesh

कोर्टी येथे कर्तुत्वान महिलांचा सन्मान व बालविज्ञान प्रदर्शनाचे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कोर्टी (ता.करमाळा) येथील डॉ.दुरंदे गुरुकुल येथे 8 मार्च सकाळी 9:30 ते 12:30 यावेळेत जागतिक महिला दिन‌ व‌ बाल-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शितलताई करे-पाटील यांच्या हस्ते होणार आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.विद्या अमोल दुरंदे या असणार आहेत. या प्रसंगी राजकीय, सामाजिक, आरोग्य, ग्रामविकास व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या करमाळा तालुक्यातील महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. सत्कारमूर्ती महिला म्हणून ॲड. वर्षा नानासाहेब साखरे (रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग बार्शी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य ), नलिनी संजय जाधव (राजकीय व सामाजिक कार्य), अनुसया रघुनाथ शिंदे (प्रगतशील शेतकरी), ह.भ.प. सपनाताई बाळासाहेब साखरे, राजुरी (राज्यपाल पुरस्कार विजेती कीर्तनकार ), पूजा मोहन मारकड (ग्रामविकास,विद्यमान लोकनियुक्त सरपंच, विहाळ),मा.ह.भ.प. गीतांजली राजेंद्र अभंग (युवा कीर्तनकार), गायत्री महेश कुमार कुलकर्णी (आदर्श सरपंच, मांजरगाव), मंजुषा जगन्नाथ टेकाडे ( उत्कृष्ट परिचारिका), प्रमिला सोपान जाधव (बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य) यांचा सन्मान होणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी ,अधिकारी ,पदाधिकारी ग्रामस्थ व पालक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे तसेच बाल-विज्ञान प्रदर्शन ‌पाहण्यासाठी , विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित रहावे . असे आवाहन परिवर्तन प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल दादासाहेब दुरंदे व डॉ.दुरंदे गुरुकुल प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुशीला हरिश्चंद्र जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!