किरकोळ कारणावरून पतीकडून पत्नीस बेदम मारहाण

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा ता.२४ : तु रात्री मला न विचारता कोठे गेली असे म्हणत पतीने पत्नीस लोखंडी गजाने बेदम मारहाण केली आहे.हा प्रकार २४ डिसेंबरला रविवारी सकाळी सात वाजता पांगरे (ता.करमाळा) येथे घडला आहे.
यात पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले की, की २३ डिसेंबरला संध्याकाळी पती तानाजी सुभाष शिंदे हा दारू पिऊन घरी आला व तो वाद घालू लागला. त्यामुळे मी माझ्या मुलांना घेऊन शेजारच्या वस्तीवर मुक्कामी गेले. २४ डिसेंबरला सकाळी 7 वाजता मुलासह घरी आले असता, तु मला न सांगता कोठे गेली होतीस.. असे म्हणून पतीने लोखंडी गजाने मला मारहाण करून जखमी केले तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.


