करमाळा तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे..

करमाळा, ता.११ : संदेश प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने काढलेल्या ताज्या आदेशानुसार तहसील कार्यालय करमाळा येथील सर्व कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी कार्यालयात येताना ओळखपत्र परिधान करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या दि. १० सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार कार्यालयात ओळखपत्र न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा तक्रारी दाखल करण्याचे अधिकार दिले आहेत.
तहसील कार्यालयातील शिस्त व सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व कर्मचाऱ्यांनी तो आवर्जून पाळावा, असे आवाहन तहसीलदार ठोकडे यांनी केले आहे. या प्रकरणी कृष्णा चंद्रकांत शिंदे ,रा. भाळवणी यांनी तहसीलदार यांच्याकडे 11 सप्टेंबरला लेखी तक्रार दिली होती.




