"जामा मस्जिद" येथे सावंत गटाच्यावतीने इफ्तार पार्टी.. -

“जामा मस्जिद” येथे सावंत गटाच्यावतीने इफ्तार पार्टी..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील जामा मस्जिद येथे सावंत गटाच्यावतीने इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले, यामध्ये सावंत गटाचे नेते सुनील बापु सावंत, नगरसेवक संजय सावंत नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, करमाळा विविध कार्यकारी सोसायटी चे अध्यक्ष मनोज गोडसे, भारिप चे देवा लोंढे, माजी नगरसेवक दिपक सुपेकर,नासीर कबीर, आशपाक सय्यद, आलीम शेख, विजय सुपेकर आदीजण उपस्थित होते.

याप्रसंगी जामा मस्जिद जमात च्या वतीने सिंकदर सय्यद मजहर नालबंद, जमीर सय्यद हाजी उस्मान सय्यद, वाजीद शेख फिरोज बेग अकबर बेग यांनी इफ्तार पार्टी साठी आलेल्या सर्वाचे टोपी व रूमाल देवून स्वागत केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत बोलताना सुनील बापु सावंत म्हणाले की, जामा मस्जिद मध्ये सावंत परिवार गेल्यां तीन पिढ्यापासुन म्हणजे कै,डी,के, सावंत,कै, सुभाष आण्णा सावंत यांनी चालु केलेली परपंरा आम्ही तिसरी पिढीत ही माझे बंधु पं,स, सदस्य राहुल सावंत वकील नगरसेवक संजय सावंत व आमचे सर्व सावंत परिवार जपत आहें दरवर्षी मुस्लिम बांधवासाठी इफ्तार पार्टी चे आयोजन करुन यामधुन सामाजिक सलोखा टिकवुन ठेवण्यासाठी इफ्तार पार्टी हे एक चांगले माध्यम आहे.

यावेळी समीर शेख़, नागेश उबाळे, पांडुरंग सावंत दिपक मुसळे जावेद शेख अल्ताफ दारुवाले मैनुद्दीन बेग आनंद रोडे राजु वीर,हुजेफ शेख ,मुद्दस्सर शेख युवराज सिरसट रमेश हवालदार,साजीद बेग सागर सामसे मुनाज शेख,अमोल मोरे आलीम खान,आदीजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!